
पुसद तालुका प्रतिनिधी:——
पुसद निवासी प्रख्यात विधीज्ञ तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे नवनियुक्त सदस्य ॲड. आशिष पंजाबराव देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे.
. दि. १७ सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अॅड. आशिष देशमुख यांनी यापुर्वी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत सदस्य म्हणुन ते मोठ्या मताधिक्याने निवडुन आले. यापुर्वी ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य होते. त्यांच्या या फेरनिवडीबद्दल सर्वा कडून अभिनंदन व्यक्त होत आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply