Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Blog

वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग

Ramrav Rathod Sep 22, 2026 0



विशेष प्रतिनिधी:—-

.               काळी दौ ग्रामपंचायतीच्या आगामी होऊ घातलेल्या  निवडणुकीकरिता वर्षानुवरचे ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदी स्थान मांडून बसलेल्या काही सदस्यांनी सरपंच पदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून राजकीय वर्तुळात मीच सरपंच बनणार अशी हुशारकी मिरवीत असल्यामुळे गावामधील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
.              राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गावातील जनसामान्यात सध्या विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या काही सदस्यानी आपल्या कार्यकाळात गावाच्या तसेच संबंधित प्रभागाच्या विकासासाठी नेमके काय केले? याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
.               मागील  काही वर्षांत आपल्या वार्डातील मूलभूत प्रश्न, रस्ते, पाणी, स्वच्छता, नाली व्यवस्था यांसह विविध विकासकामांकडे पुरेसे लक्ष न देणारे काहीजण आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जनतेतून सरपंच निवडून आलो तर गावाचा विकास करून दाखवू” अशी स्वप्ने जनतेसमोर रंगवीत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
.            निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काही स्वयंघोषित  नेत्यांनी सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, “वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीत संधी मिळूनही विकासकामांचा ठोस ठसा उमटवता आला नाही, तर आता अचानक विकासाचे आश्वासन कसे?” असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
.         ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, वार्डनिहाय विकास, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांचे केवळ आश्वासन नव्हे, तर मागील कार्यकाळातील कामगिरी, वार्डातील विकास आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संपर्क याचा विचार करूनच मतदान केले जाईल, अशी चर्चा काळी दौ. गावामध्ये मध्ये रंगू लागली आहे.

निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसतानाच राजकीय वातावरण तापू लागले असून, “वेळ आल्यावर जनता आपल्या मतातून योग्य उत्तर देईल”, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.आगामी काळात काळी दौ ग्रामपंचायतीच्या राजकारणात कोण कोणते स्वयंघोषित नेते कोण कोणती आश्वासने देऊन मतदारांना रिझवण्याचे काम करणार याकडे मतदारांची लक्ष लागले आहे.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा
Ramrav Rathod Sep 3, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile