
पुसद तालुका प्रतिनिधी:—-
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने त्यांच्या प्रस्तावित मागण्या त्वरित मान्य करा अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन सकल मराठा समाज पुसद जिल्हा यवतमाळ यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांचे मार्फत मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देत मागणी केली आहे.
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2026 पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला सातारा गॅझेट, कोल्हापूर गॅझेट, हैदराबाद गॅजेट मधील नोंदी नुसार तसेच शिंदे समितीच्या 58 लाख नोंदीनुसार सकल मराठा बांधवांना कुणबी (ओबीसी चे) प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच सकल मराठा समाज बांधवावर शासनाच्या वतीने ज्या ज्या गुन्ह्याची नोंद केली आहे ती सगळी गुन्हे मागे घेण्यात यावी. अशी ही मागणी सकल मराठा समाज पुसद यांच्या वतीने करण्यात आली आहे.

संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी याच मागण्यान करिता सकल मराठा समाजाच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनास जागे करीत मागण्या मान्य करण्यास बाद्य केले होते. शासनाने संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर करून प्रत्यक्षात मात्र मागण्यांची दखल घेतली नाही. म्हणून परत संघर्ष युद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.सकल मराठा समाज पुसद जिल्हा यवतमाळ विदर्भ यांचाही संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा आहे. असे निवेदनात नमूद करीत सकल मराठा समाजाने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी पुसद यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांना या निवेदनाची प्रत पाठवून सकल मराठा समाजास सहकार्य करावे अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. शासन काय निर्णय घेणार याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांना निवेदन सादर करताना सकल मराठा समाजाचे नितीन पवार, अनिल चव्हाण पाटील, दीपक भाऊराव टेटर, प्रवीण कदम, रामा काशीनाथ ठाकरे,करण ढेकळे, दीपक देशमुख, गणेश पावडे, सुशांत महल्ले, प्रभाकर टेटर,दीपक काळे, बंडू पारटकर, गौरव सुकळकर, सदानंद वानखेडे, वामन देशमुख,माधव भिवाजी टेटर,तेजस विजय गांजरे, सचिन नारायणराव बाबुळकर, अजय गणेश दळवी, जय भारत जाधव, संतोष भोसले,गजानन काकडे, मनोज कोल्हेकर, सचिन वसंतराव सुरोशे, नारायण जाधव, शिवाजीराव कदम,विजय बाबर,राजेश गणपतराव गावंडे, प्रभाकर पाटील, किसन भोसले, कैलास देशमुख, कविता दीपक टेटर, निर्मला वामनराव देशमुख, दिशा दीपक टेटर, सुशिलाबाई पांडुरंग ठाकरे, लीलाबाई रामा ठाकरे, रंजनाबाई प्रभाकर ठाकरे, कल्पना भारत जाधव, शांताबाई रघुनाथ भोसले, वर्षा गुलाबराव देशमुख, जय मला विजय गांजरे, दिपाली पंजाबराव देशमुख, नीता कैलास देशमुख,केशव संतोष जाधव, शुभम ठाकरे आदींनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांना निवेदन सादर केले.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply