
पुसद तालूका प्रतिनिधी —
. वसंतनगर पोलीस ठाण्याचा कारभार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांनी हाती घेतल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला सुरुवात केली आहे.
. दिनांक १८ सप्टेंबर रोजी खडसे मैदान गल्ली परिसरात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शेख महफुज यांच्या टिनाच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत एक क्विंटल एक किलो गोमांस, अंदाजे २५ हजार २५० रुपये किमतीचे, तसेच कुऱ्हाड, सुरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी शेख वाजीत शेख लुकमान वय ३० वर्षे, व्यवसाय खाटीक, रा. अखेरत नगर, पुसद याच्याविरुद्ध वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेले गोमांस पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित मांस विक्री अथवा इतर कोणताही अवैध धंदा सुरू असल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना थेट माहिती द्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांनी केले आहे.
. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अवैध प्रकारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड, सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडे, पोलीस नाईक सुरेश राठोड, सुनील मोरे, संतोष राठोड, विजय ठाकूर, मनोज चव्हाण, आशिष राठोड, श्रीकांत राठोड तसेच महिला पोलीस चालक सुनिता राठोड यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीराम धाडवे करीत आहेत.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply