
विषेश प्रतिनिधी :-
काळी (दौ.) ग्रामपंचायतचे वतीने सामान्य निधीच्या माध्यमातून गावातील गरजवंत दिव्यांग नागरिकांना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
काळी( दौ.)येथील सरपंच तथा प्रशासक सौ.निशाताई संतोष राठोड यांच्या प्रयत्नाने तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत च्या माध्यमातून कर वसुली मधून पाच टक्के निधी मधील रकमे मधून साहित्य खरेदी करून जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये साखर,तांदूळ, तुरदाळ मुंग डाळ, खाद्यतेल, बेसन, साबण, हळद आदी जीवनावश्यक वस्तूंची किट तयार करून ती कीट गावातील दिव्यांग नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच सुभाष रामभाऊ कोसलगे, शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख संतोष राठोड,मोहम्मद शरीफ अब्दुल वहाब,देवानंद आंबोरे यांचे सह ग्रामपंचायतचे कर्मचारी सुदेश नरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
गरजवंत दिव्यांगांना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंची ग्रामपंचायत नि भेट म्हणून दिलेली किट मिळताच दिव्यांग लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सामान्य फंडातून पाच टक्के निधी गरजू दिव्यांगांना वाटप करण्याबाबतचे नियम असतानाही कित्येक ग्रामपंचायत या निधीचा योग्य तो वापर करीत नाही.परिसरातील ग्रामपंचायतींनी काळी दौ.ग्रामपंचायत चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापल्या ग्रामपंचायत मधील सामान्य निधीतील पाच टक्के राखीव फंड वितरित करावा अशीही परिसरातील गरजू दिव्यांग नागरिकांकडून मागणी होत आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply