
विशेष प्रतिनिधी:—–
. बंजारा तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे विमानतळ निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती तरुण तडफदार राज्यमंत्री मा. इंद्रनील नाईक आणि भाजपा विधानपरिषद सदस्य बाबूसिंग महाराज यांच्या मंत्रालयातील बैठकीच्या वृत्तातून समोर आली. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.
परंतु घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाला बंजारा समाज अधिक महत्त्व देतो.
. मा.नरेंद्र मोदी आणि मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून बंजारा समाजाला यापूर्वीही अनेक आश्वासने मिळाली आहेत. मात्र बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची ठोस भूमिका अद्याप स्पष्ट दिसत नाही. समाजाच्या आंदोलनांची, उपोषणांची साधी दखलही घेतली जात नाही, ही समाजाची भावना आहे.
. आज लाखो बंजारा बांधव देशाच्या विविध भागांतून, विशेषतः रामनवमीसारख्या मोठ्या पर्वावर, पोहरादेवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी पुरेशी निवासव्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. माता-भगिनींना अनेकदा उघड्यावर राहण्याची आणि शौचविधीची गैरसोय सहन करावी लागते.हे वास्तव्य आहे.
. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि देशाच्या इतर भागांतून येणाऱ्या बंजारा भाविकांसाठी मार्गात आणि पोहरादेवी परिसरात पुरेशा सुविधा नाहीत.वारकऱ्यांसाठी जशी नियोजनबद्ध व्यवस्था उभी केली जाते, तशीच व्यवस्था पोहरादेवीच्या बंजारा भाविकांसाठी का होऊ नये? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
. सरकारने प्रथम शेगाव आणि शिर्डीच्या देवस्थान विकास धर्तीवर पोहरादेवीचा सर्वांगीण तीर्थक्षेत्र विकास करावा अशी मागणी करीत आधुनिक भक्तनिवास, स्वच्छ व आधुनिक शौचालयांची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रसादालय आणि मोफत भोजन व्यवस्था,महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा, देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व पार्किंग व्यवस्था, संपूर्ण तीर्थक्षेत्राचा नियोजनबद्ध विकास आधी विकासात्मक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
. समाजाला भूक लागली असताना अन्नाची गरज असते; सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न देण्याच्या घोषणा करून समाजाची भूक भागत नाही! असे उपरोधात्मक भावना व्यक्त करीत आकाश जाधव यांनी विमानतळ किती बंजारा बांधव वापरू शकतील, हा देखील सरकारने विचार करण्याचा प्रश्न आहे. समाजातील सामान्य, गरीब आणि ग्रामीण बांधवांसाठी आज दोन वेळच्या अन्नापासून निवास आणि स्वच्छतागृहापर्यंतच्या मूलभूत सुविधा अधिक महत्त्वाच्या आहेत.
. पोहरादेवीसाठी केवळ वर्तमानपत्रातील बातम्या आणि घोषणा नकोत; प्रत्यक्ष निधी, आराखडा आणि वेळबद्ध विकासकामे हवीत.बंजारा समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या पोहरादेवीचा विकास हा केवळ पर्यटनाचा विषय नाही, तर देशभरातील बंजारा समाजाच्या श्रद्धा, अस्मिता आणि सन्मानाचा प्रश्न आहे.काहीतरी पेपरात बातमी लावून सरकारची बंजारा समाजाबद्दलची उदासीनता लपणार नाही! असे मत व्यक्त करीत आकाश जाधव यांनी बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता सरकारने विचार करावा. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply