
पुसद तालुका प्रतिनिधी :——-
दि.2 सप्टेंबर 2026 रोजी पुसद शहरातील रामकृष्ण लॉज मध्ये एका 20 वर्षीय तरुणाने पंख्याला लटकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अतिश सिद्धार्थ धुळे वय 20 वर्ष राहणार निंबी पार्डी तालुका पुसद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतकाचे मामा राहुल सुधाकर धवसे वय 40 वर्ष यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन पुसद शहर मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलआहे.
पोलिसांमार्फत मिळालेल्या माहिती नुसार दि.2 सप्टेंबर रोजीच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास ही घडली असल्याचा अंदाज वरती दिल्या जात आहे. सदर तरुणासोबत निंबी पार्डी येथील एक तरुणी सुद्धा त्याच्या सोबत लॉज मध्ये होती. सदर तरुणीला पुसद शहर पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.
निंबी पार्डी येथील वीस वर्षीय अतिश धुळे याने आत्महत्या केल्याची माहिती पुसद शहर पोलिसांना मिळताच,तात्काळ पोलिसांमार्फत घटनास्थळ गाठून प्राथमिक पंचनामा करून मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.वीस वर्षीय अतिश याने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी त्याचे सोबत लॉज मध्ये असलेली तरुणी काय जाब देणार याकडे लक्ष लागले आहे.सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पीएसआय राजू ठोमरे हे करीत आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply