पुसदच्या सौरभ भांगडे यांची वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने बाजी!
वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव

पुसद (प्रतिनिधी) :
. वैद्यकीय क्षेत्रात पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी सौरभ संजय भांगडे यांनी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) अर्थात अस्थिरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत त्यांनी महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे पुसदसह यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
. सौरभ संजय भांगडे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नीट (NEET) परीक्षेत त्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर मुंबई येथील प्रतिष्ठित के.ई.एम. रुग्णालयातून एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईतील नायर रुग्णालयातून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत त्यांनी अस्थिरोगशास्त्र विषयात महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
. सौरभ भांगडे यांचे वडील डॉ. संजय भांगडे हे बालरोगतज्ज्ञ असून, ते पुसद येथे वैद्यकीय सेवा देतात. भांगडे कुटुंबाचे पुसद हे मूळ गाव आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कुटुंबातून आलेल्या सौरभ भांगडे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या बळावर राज्यस्तरावर मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या यशामुळे पुसदच्या नावलौकिकात भर पडली असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply