माळवागद येथील जि प शाळेत शिक्षक दिन साजरा
आज दिनांक ३० सप्टेंबर २०२६ वार बुधवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा माळवाकद पंचायत समिती महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शिक्षण परिषद व सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पांडुरंग धर्मा राठोड तथा प्रमुख अतिथी म्हणून केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने झाली. परिपाठानंतर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. सेवापूर्ती निमित्त आदरनीय श्री दिलीप राजूसिंग राठोड यांचाशाल श्रीफळ अहिर व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिक्षक परिषदेअंतर्गत प्रशासकीय व शासकीय माहिती या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगरवाडी चे सहाय्यक शिक्षक अमोल जगताप सर यांनी आनापान याविषयी मार्गदर्शन केले तर जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा पोखरी येथील सहाय्यक शिक्षक सुधीर दुद्दल यांनी स्पर्धा परीक्षा संदर्भात शिष्यवृत्ती/ एन एम एम एस /जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा/ शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले.केंद्र समन्वयक श्री विजय ढेंगळे सर यांनी प्रशासकीय माहिती देऊन प्रशासनातील विविध अहवाल गोळा केले. पोखरी केंद्रांतर्गत रुजू झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सोबतच माळवाकद येथील नवनियुक्त अंगणवाडी सेविका सौ. मोनिका गोपाल राठोड यांचे सुद्धा स्वागत करण्यात आलेशिक्षण परिषदे अंतर्गत केंद्रातील सर्व शिक्षकांसाठी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विषयशिक्षक श्री उज्वलदीप धुर्वे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या विषयशिक्षिका श्रीमती शितल मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पांडुरंग राठोड, केंद्र समन्वयक – श्री विजय ढेंगळे सर, श्री.प्रज्वलदिप धुर्वे सर,श्री रविंद्र खाडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबासाहेब नगरचे मुख्याध्यापक श्री अमोल रवींद्र जगताप सर व अंकुश जाधव सर, यांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543












Leave a Reply