
विशेष प्रतिनिधी:—-
. काळी दौ ग्रामपंचायतीच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता वर्षानुवरचे ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदी स्थान मांडून बसलेल्या काही सदस्यांनी सरपंच पदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून राजकीय वर्तुळात मीच सरपंच बनणार अशी हुशारकी मिरवीत असल्यामुळे गावामधील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गावातील जनसामान्यात सध्या विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या काही सदस्यानी आपल्या कार्यकाळात गावाच्या तसेच संबंधित प्रभागाच्या विकासासाठी नेमके काय केले? याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
. मागील काही वर्षांत आपल्या वार्डातील मूलभूत प्रश्न, रस्ते, पाणी, स्वच्छता, नाली व्यवस्था यांसह विविध विकासकामांकडे पुरेसे लक्ष न देणारे काहीजण आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जनतेतून सरपंच निवडून आलो तर गावाचा विकास करून दाखवू” अशी स्वप्ने जनतेसमोर रंगवीत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काही स्वयंघोषित नेत्यांनी सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, “वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीत संधी मिळूनही विकासकामांचा ठोस ठसा उमटवता आला नाही, तर आता अचानक विकासाचे आश्वासन कसे?” असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, वार्डनिहाय विकास, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांचे केवळ आश्वासन नव्हे, तर मागील कार्यकाळातील कामगिरी, वार्डातील विकास आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संपर्क याचा विचार करूनच मतदान केले जाईल, अशी चर्चा काळी दौ. गावामध्ये मध्ये रंगू लागली आहे.
निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसतानाच राजकीय वातावरण तापू लागले असून, “वेळ आल्यावर जनता आपल्या मतातून योग्य उत्तर देईल”, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.आगामी काळात काळी दौ ग्रामपंचायतीच्या राजकारणात कोण कोणते स्वयंघोषित नेते कोण कोणती आश्वासने देऊन मतदारांना रिझवण्याचे काम करणार याकडे मतदारांची लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply