Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Blog

गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई

Ramrav Rathod Sep 19, 2026 0



पुसद तालूका प्रतिनिधी —

.        वसंतनगर पोलीस ठाण्याचा कारभार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांनी हाती घेतल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला सुरुवात केली आहे.
.         दिनांक १८ सप्टेंबर रोजी खडसे मैदान गल्ली परिसरात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शेख महफुज यांच्या टिनाच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत एक क्विंटल एक किलो गोमांस, अंदाजे २५ हजार २५० रुपये किमतीचे, तसेच कुऱ्हाड, सुरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी शेख वाजीत शेख लुकमान वय ३० वर्षे, व्यवसाय खाटीक, रा. अखेरत नगर, पुसद याच्याविरुद्ध वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.


.               आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेले गोमांस पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित मांस विक्री अथवा इतर कोणताही अवैध धंदा सुरू असल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना थेट माहिती द्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांनी केले आहे.
.              अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अवैध प्रकारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड, सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडे, पोलीस नाईक सुरेश राठोड, सुनील मोरे, संतोष राठोड, विजय ठाकूर, मनोज चव्हाण, आशिष राठोड, श्रीकांत राठोड तसेच महिला पोलीस चालक सुनिता राठोड यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीराम धाडवे करीत आहेत.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा
Ramrav Rathod Sep 3, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile