
विशेष प्रतिनिधी:——
काळी( दौ.) वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्राधिकारी, सहाय्यक वनपाल, वनरक्षक आदी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून कार्यालयामध्ये हे कर्मचारी शोधूनही सापडत नसल्याबाबतची जनमानसात चर्चा आहे.
काळी( दौ.) वन परिक्षेत्राचे कार्यालयात कोणताच कर्मचारी हजर राहत नाही. कार्यालयामध्ये वनमजूर तथा तात्पुरत्या रोजंदारीवर कार्य करणारे एक दोन व्यक्ती कार्यालय सांभाळात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारा अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतामधील उभी पिके वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे नेस्तनाबूत होत आहेत. याबाबतचे निवेदन देण्याकरता काळी (दौ.) वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये आलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सुद्धा कार्यालयामध्ये कोणताच कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची निवेदने कार्यालयामध्ये घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांनी आग्रह,विनवणी केल्यानंतर निवेदन घेतलेच तर त्यावर निवेदन स्वीकारल्याबाबतचे आवक नोंदवहीत नोंद न करता निवेदनकर्त्यांना सत्य प्रतिवर( ओसी) सही सिक्का दिल्या जात नाही. आधी गंभीर बाबी या कार्यालयामध्ये सुरू आहे.
काळी (दौ.) वनपरिक्षेत्र अधिकारी तथा कर्मचारी कार्यालयामध्ये हजरत राहत नसल्याबाबत तसेच वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड असल्याबाबतचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास मोरे यांनी उपसंरक्षण अधिकारी यवतमाळ यांना सादर करीत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply