
विशेष प्रतिनिधी:—-
काळी (दौ.) वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या शेतामधील उभ्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे शेतकरी आपली तक्रार कैफियत देण्याकरिता संबंधित कार्यालयांमध्ये गेले असता संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्रपाल मुख्यालयी हजरच राहत नसल्याचे शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे. वन्य प्राण्यांनी शेत पिकांच्या केलेल्या नासाडी बाबत कोणाकडे तक्रार करावी हा यक्षप्रश्न शेतकरी यांना भेडसावत आहे.

काळी (दौ.) वनपरीक्षेत्रा मध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचे बळी सुद्धा गेलेले आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हैदोषामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये आपली शेत कामे करणे ही अवघड होऊन बसले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी,वनक्षेत्रपाल तथा वनरक्षक आदी कर्मचारी मुख्यालय शोधूनही सापडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. काळी (दौ.)वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांनी मुख्यालय राहून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती उपाययोजना करावी.अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे. काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी मुख्यालय न राहल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या बाबीची योग्य ती खबरदारी घेऊन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच या वन परीक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांना योग्य ती तंबी देऊन वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती कार्यवाही करून मुख्यालयी राहण्याबाबत आदेशित करावे. काळी (दौ.) वनापरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यास त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी ही मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply