Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 5:12 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • तिसऱ्या सूचीच्या माध्यमातून बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण शक्य मा.खासदार हरीभाऊ राठोड
Blog

तिसऱ्या सूचीच्या माध्यमातून बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण शक्य मा.खासदार हरीभाऊ राठोड

Ramrav Rathod Aug 25, 2026 0



गहूली  येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी खासदार हरिभाऊ राठोड,आमदार महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, माजी आमदार निलय नाईक यांचे सह संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली होती.परंतु शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला नाही. बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण कशा प्रकारे मिळवता येईल याबाबत गहूली येथे विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते.


          या सभेमध्ये माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपल्या अभ्यासपूर्ण माहिती तथा अनुभवाच्या आधारे बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण कशा प्रकारे मिळू शकते हे समजावून सांगताना त्यांनी तिसऱ्या सूचीचे माध्यमातून वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनी जे आरक्षण मिळालेले आहे तेच संविधानिकरीत्या घटनादुरुस्तीचे माध्यमातून मिळवता येऊ शकेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी यावर दबाव गट निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
             विचारविनिमय सभेमध्ये अनुसूचित जमाती चेच आरक्षण मिळण्यावरही काही विचारवंतांनी आपले मत व्यक्त केले.


           या विचारविनिमय सभेला मा.खासदार हरिभाऊ राठोड, आमदार महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, माजी आमदार निलय नाईक यांचे सह इंजिनियर सुभाष राठोड, पत्रकार शंकर आडे पोहरादेवी, पत्रकार राम राठोड  पुसद, एडवोकेट अरुणाताई चव्हाण, छायाताई राठोड जयश्रीताई राठोड नागपूर, दीक्षा ताई जाधव मुंबई,लताताई राठोड वर्धा, प्रकाश राठोड नांदेड, गोरसेना गोरसिकवाडी चे अनिल राठोड,एडवोकेट अभिजीत राठोड मानोरा,लता रामकृष्ण चव्हाण यवतमाळ,कमला जाधव यवतमाळ, पुष्पा ताई जाधव यवतमाळ,पत्रकार गणेश राठोड पुसद,कवी शांतीकुमार राठोड पुसद यांचे सह शेकडो बंजारा समाजातील विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिक, पत्रकार, कवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार सुहास पवार गहूली यांनी या सभेचे आयोजन केले होते.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile