
गहूली येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी खासदार हरिभाऊ राठोड,आमदार महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, माजी आमदार निलय नाईक यांचे सह संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली होती.परंतु शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला नाही. बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण कशा प्रकारे मिळवता येईल याबाबत गहूली येथे विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपल्या अभ्यासपूर्ण माहिती तथा अनुभवाच्या आधारे बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण कशा प्रकारे मिळू शकते हे समजावून सांगताना त्यांनी तिसऱ्या सूचीचे माध्यमातून वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनी जे आरक्षण मिळालेले आहे तेच संविधानिकरीत्या घटनादुरुस्तीचे माध्यमातून मिळवता येऊ शकेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी यावर दबाव गट निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
विचारविनिमय सभेमध्ये अनुसूचित जमाती चेच आरक्षण मिळण्यावरही काही विचारवंतांनी आपले मत व्यक्त केले.

या विचारविनिमय सभेला मा.खासदार हरिभाऊ राठोड, आमदार महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, माजी आमदार निलय नाईक यांचे सह इंजिनियर सुभाष राठोड, पत्रकार शंकर आडे पोहरादेवी, पत्रकार राम राठोड पुसद, एडवोकेट अरुणाताई चव्हाण, छायाताई राठोड जयश्रीताई राठोड नागपूर, दीक्षा ताई जाधव मुंबई,लताताई राठोड वर्धा, प्रकाश राठोड नांदेड, गोरसेना गोरसिकवाडी चे अनिल राठोड,एडवोकेट अभिजीत राठोड मानोरा,लता रामकृष्ण चव्हाण यवतमाळ,कमला जाधव यवतमाळ, पुष्पा ताई जाधव यवतमाळ,पत्रकार गणेश राठोड पुसद,कवी शांतीकुमार राठोड पुसद यांचे सह शेकडो बंजारा समाजातील विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिक, पत्रकार, कवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार सुहास पवार गहूली यांनी या सभेचे आयोजन केले होते.

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply