Skip to content
  • Sunday, 29 November 2026
  • 7:44 am
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • स्वयंघोषित नेत्याच्या अरेरावी मुळे पुसद विधानसभा कार्यक्षेत्रात  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अ.प.)दहशतीचे वातावरण
Blog

स्वयंघोषित नेत्याच्या अरेरावी मुळे पुसद विधानसभा कार्यक्षेत्रात  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अ.प.)दहशतीचे वातावरण

Ramrav Rathod Aug 23, 2026 0

स्वयंघोषित नेत्याच्या अरेरावी मुळे पुसद विधानसभा कार्यक्षेत्रात  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अ.प.)दहशतीचे वातावरण

कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करून, “मीच भाऊंच्या आणि ताईंच्या जवळचा कार्यकर्ता” अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांमुळे सर्वसामान्य तथा निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची कुजबुज सुरू आहे. दहशत निर्माण करू पाहणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी  एक गोष्ट लक्षात ठेवावी—दहशतीने जवळीक सिद्ध होत नाही आणि चाटुकारितेने नेतृत्वाची मर्जी मिळत नाही.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांची राजकीय शिकवण ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. कार्यकर्ता मोठा असो किंवा छोटा, जुना असो किंवा नवखा—प्रत्येकाच्या योगदानाचा आदर करणे, प्रत्येकाला संधी देणे आणि सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाणे, हीच खरी नेतृत्वाची पद्धत आहे.
राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांच्या नावाचा आधार घेऊन इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करणे , स्वतःचे महत्त्व वाढवणे आणि “माझ्याशिवाय पक्षात दुसरा कोणीच नाही” असा आव आणणारा कार्यकर्ता कितीही जवळीक दाखवित असला तरी तो भाऊंच्या विचारांचा खरा प्रतिनिधी होऊ शकत नाही. अशी भावना  कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
                 नेतृत्व म्हणजे माणसं तोडणे नाही, तर माणसं जोडणे.
नेतृत्व म्हणजे कार्यकर्त्याला दाबणे नाही, तर त्याला उभे करणे.
नेतृत्व म्हणजे स्वतःभोवती गर्दी करणे नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी देणे. असे गृहीत असतानाही पुसद विधानसभा मतदारसंघातील काही स्वयंघोषित नेते स्वतःला मी म्हणजेच सर्वस्व समजून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावल्या जात  आहे.
आदरणीय मनोहररावजी नाईक साहेब यांचे कार्यकाळात अशा स्वयं घोषित नेत्यांची डाळ शिजत असल्याचे ऐकिवात नाही. परंतु राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात मात्र मोहिनीताई नाईक यांचे  मीच कसा विश्वासू आणि जवळचा आहे. असे भासविण्याच्या प्रयत्नात सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र दुरावल्या जात आहे. वेळीच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील स्वयंघोषित दहशत निर्माण करू पाहणाऱ्या नेत्यांना वेळीच लगाम लावली नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता दुरावल्या शिवाय राहणार नाही. अशीही जनभावना व्यक्त केल्या जात आहे. 
     स्वयंघोषित नेत्यांनी चाटुकारिता नव्हे, तर निष्ठा; दहशत नव्हे, तर विश्वास; गटबाजी नव्हे, तर सर्वसमावेशकता हीच वाट निवडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षवादीच्या दृष्टीने कार्य करणे पक्षाच्या हिताचे राहील अशी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
येत्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वयंघोषित नेत्यांना जरब बसवित  सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा. नाहीतर शेवटी येणारा काळ ठरवेल कोण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता  होता आणि कोण इंद्रणील नाईक यांच्या विचारांच्या जवळ होता!

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
Vidhyalankars poddhar larning school shodh nibandh purshkar
Ramrav Rathod Oct 31, 2026
Blog
Pusadchya saurabh bhangade yanchi vaidhakiy kshetrat baji
Ramrav Rathod Oct 27, 2026
Blog
Tender murmache pratyakshat wapar maticha
Ramrav Rathod Oct 14, 2026
Blog
Malwagad:
Ramrav Rathod Oct 3, 2026
Blog
Malwagad yethil z. P. Salet
Ramrav Rathod Oct 3, 2026
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
Vidhyalankars poddhar larning school shodh nibandh purshkar
Ramrav Rathod Oct 31, 2026
Blog
Pusadchya saurabh bhangade yanchi vaidhakiy kshetrat baji
Ramrav Rathod Oct 27, 2026
Blog
Tender murmache pratyakshat wapar maticha
Ramrav Rathod Oct 14, 2026
Blog
Malwagad:
Ramrav Rathod Oct 3, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile