
स्वयंघोषित नेत्याच्या अरेरावी मुळे पुसद विधानसभा कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अ.प.)दहशतीचे वातावरण
कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करून, “मीच भाऊंच्या आणि ताईंच्या जवळचा कार्यकर्ता” अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांमुळे सर्वसामान्य तथा निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची कुजबुज सुरू आहे. दहशत निर्माण करू पाहणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—दहशतीने जवळीक सिद्ध होत नाही आणि चाटुकारितेने नेतृत्वाची मर्जी मिळत नाही.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांची राजकीय शिकवण ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. कार्यकर्ता मोठा असो किंवा छोटा, जुना असो किंवा नवखा—प्रत्येकाच्या योगदानाचा आदर करणे, प्रत्येकाला संधी देणे आणि सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाणे, हीच खरी नेतृत्वाची पद्धत आहे.
राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांच्या नावाचा आधार घेऊन इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करणे , स्वतःचे महत्त्व वाढवणे आणि “माझ्याशिवाय पक्षात दुसरा कोणीच नाही” असा आव आणणारा कार्यकर्ता कितीही जवळीक दाखवित असला तरी तो भाऊंच्या विचारांचा खरा प्रतिनिधी होऊ शकत नाही. अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
नेतृत्व म्हणजे माणसं तोडणे नाही, तर माणसं जोडणे.
नेतृत्व म्हणजे कार्यकर्त्याला दाबणे नाही, तर त्याला उभे करणे.
नेतृत्व म्हणजे स्वतःभोवती गर्दी करणे नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी देणे. असे गृहीत असतानाही पुसद विधानसभा मतदारसंघातील काही स्वयंघोषित नेते स्वतःला मी म्हणजेच सर्वस्व समजून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावल्या जात आहे.
आदरणीय मनोहररावजी नाईक साहेब यांचे कार्यकाळात अशा स्वयं घोषित नेत्यांची डाळ शिजत असल्याचे ऐकिवात नाही. परंतु राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात मात्र मोहिनीताई नाईक यांचे मीच कसा विश्वासू आणि जवळचा आहे. असे भासविण्याच्या प्रयत्नात सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र दुरावल्या जात आहे. वेळीच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील स्वयंघोषित दहशत निर्माण करू पाहणाऱ्या नेत्यांना वेळीच लगाम लावली नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता दुरावल्या शिवाय राहणार नाही. अशीही जनभावना व्यक्त केल्या जात आहे.
स्वयंघोषित नेत्यांनी चाटुकारिता नव्हे, तर निष्ठा; दहशत नव्हे, तर विश्वास; गटबाजी नव्हे, तर सर्वसमावेशकता हीच वाट निवडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षवादीच्या दृष्टीने कार्य करणे पक्षाच्या हिताचे राहील अशी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
येत्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वयंघोषित नेत्यांना जरब बसवित सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा. नाहीतर शेवटी येणारा काळ ठरवेल कोण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता होता आणि कोण इंद्रणील नाईक यांच्या विचारांच्या जवळ होता!
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply