Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 5:13 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • शाळा सोडून  राजकीय समीकरणात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय
Blog

शाळा सोडून  राजकीय समीकरणात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय

Ramrav Rathod Aug 20, 2026 0

शाळा सोडून  राजकीय समीकरणात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय

शासकीय तथा निमशासकीय अनुदानित शाळांवर शासनाचा लाखो रुपयांचा निधी दिल्या जातो. शासकीय तथा नीमशासकीय अनुदानित शाळेवरील काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकविण्यापेक्षा चौकात बसून नागरिकांना राजकीय धडे शिकविण्याचे कार्य करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अन्धकारमय होत असल्याची पालकांत चर्चा आहे.
                  शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असताना काही शिक्षक महोदय शाळेच्या वेळेत नामांकित हॉटेलमध्ये बसून नाईकांच्या राजकारणातील समीकरणे जुळवण्यात अधिक आवड घेत असल्याची जनमानसात तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगूलागली आहे.
                 शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनी जर राजकीय डावपेच, गटबाजी आणि नेत्यांच्या राजकीय समीकरणांमध्येच अधिक वेळ घालवला, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे आणि त्यांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
               राजकारणात गोडी असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असू शकतो, मात्र शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हीच आहे. त्यामुळे शिक्षक  महोदयांनी नामांकित हॉटेलमधील  राजकीय बैठका आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या तासिका यापैकी नेमके प्राधान्य कशाला दिले पाहिजे, हे ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांनीच ठरविले पाहिजे असा प्रश्न चर्चेत आहे.
          नाईकांच्या राजकारणाची समिकरणे नामांकित हॉटेलमध्ये बसून कधीही घेता येईल पण विद्यार्थ्यांची अभ्यासांची तासीके  आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची संधी पुन्हा मिळेल का? असा प्रश्नही पालक उपस्थित करीत आहेत. संबंधित विभागाने या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून शिक्षकांची शाळेतील उपस्थिती, अध्यापनाचे तास आणि शैक्षणिक कामकाज याबाबत चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
राजकारणाची समीकरणे जुळवणाऱ्या शिक्षकांनी आधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे समीकरण जुळवावे, एवढीच  पालकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

मुख्य संपादक :-  रामराव रतन राठोड
संपर्क: 9623796543/9423433013
नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी झगर न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile