Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 5:12 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • तळागळातील कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता समजणाऱ्यांवर नेतृत्वाच्या हंटरची गरज
Blog

तळागळातील कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता समजणाऱ्यांवर नेतृत्वाच्या हंटरची गरज

Ramrav Rathod Aug 27, 2026 0


पुसद विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात कार्यकर्त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. मात्र आज काही कार्यकर्त्यांची अवस्था स्वयंघोषित नेत्यांच्या वर्तणुकीवरून कडी बनवताना टाकलेल्या निंबाच्या पानासारखी झाली आहे, म्हणजेच कडीपत्त्यासारखी झाली आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
           कडीला चव आणि औषधी गुण देण्यासाठी निंबाचे पान टाकले जाते; पण कडी तयार झाल्यानंतर ते पान बाजूला काढून टाकले जाते. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळात घराघरात फिरणारा, ऊन-पाऊस झेलत पक्षाचा विचार पोहोचवणारा, मतदारांना जोडणारा कार्यकर्ता निवडणूक संपल्यानंतर मात्र नेतृत्वाच्या  विस्मरणात जातो अशी वल्गना करीत काही स्वयंघोषित नेते नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून कार्यकर्त्यांचा वाली मीच कसा आहे अशी भावना काही निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करीत आहेत.
                   कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीपुरता वापरण्याचा घटक नाही, तर तो संघटनेचा कणा आहे. पद, सत्ता आणि प्रतिष्ठेपेक्षा तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान आणि योग्य वेळी संधी मिळणे गरजेचे आहे. परंतु वरिष्ठ नेतृत्व या बाबीकडे डोळे झाक करीत असल्याची स्वयंघोषित नेते कार्यकर्त्यांमध्ये भ्रम निर्माण करून स्वतः कार्यकर्त्यांचा वाली मीच अशी केविलवाणी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
              नेतृत्वाने स्वयंघोषित नेत्यांच्या कृतीवर तसेच वागणुकीवर लक्ष देऊन तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी ऐकल्या आणि त्यांना सोबत घेऊन पुढे गेले, तरच संघटना अधिक मजबूत होईल. अशी भावना निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. नेतृत्वाने निष्ठावान कार्यकर्ता जपला तर इतिहास घडतो. नेतृत्वाने स्वयंघोषित नेत्यांवर योग्य वेळी योग्य दखल घेत स्वयंघोषित नेत्यांची निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोणावर हंटर चालवावा   अशीही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile