
काळी (दौ) वनपरिक्षेत्र हे विविध आकर्षक वन सौंदर्याने, वनसमृद्धीने नटलेले वनक्षेत्र आहे. या वन परिक्षेत्रात बहूमूल्य अशा सागवान प्रजातीची मुबलक वृक्ष डौलाने उभी आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी,सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी, वन रक्षक यांच्या नाकर्तेपणामुळे तसेच हलगर्जीपणामुळे सागवान वृक्षाची कत्तल होत असल्याचे दृश्य वन परिसरात पहावयास मिळते.
शासनाने वनाच्या संवर्धन व संरक्षणासाठी विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या दृष्टीने सदनिका सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी, वन क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे सागवान तस्करांचे चांगभले होत असल्याची वृक्ष प्रेमींमध्ये चर्चा आहे.

वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी,वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांना योग्य ती ताकीद देऊन मुख्यालयी राहण्यासाठी बाद्य करावे.तसेच वनराईने नटलेल्या जंगलातील वृक्षाची होणारी कत्तल थांबविण्याच्या दृष्टीने योग्य ती समाज द्यावी. अशी मागणी वृक्षप्रेमी कडून केल्या जाते.
काळी( दौ) वनपरीक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल,वनरक्षक हे मुख्यालयी न राहिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही वनप्रेमीकडून देण्यात येत आहे.वरिष्ठांनी या बाबीची दखल घ्यावी अशी ही मागणी होत आहे. वरिष्ठ वन अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे वनप्रेमींचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply