
विशेष प्रतिनिधी :-
येत्या काही दिवसांमध्ये येणारे सण, उत्सव,तेव्हार निर्विघ्न, शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चौधरी यांनी 5 सप्टेंबर रोजी काळी( दौ.) येथे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या सभेमध्ये केले.
ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद अंतर्गत येत असलेल्या काळी (दौ.) येथे 5 सप्टेंबर 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या सभेचे आयोजन केले होते.या सभे करिता काळी (दौ.) परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,गणेश उत्सवानिमित्त स्थापन झालेल्या गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी शासनाच्या ध्येय धोरणाची तसेच नियम व अटीला बाध्य राहून शांततापूर्ण वातावरणामध्ये सण, उत्सव, तेव्हार साजरे करण्याकरिता मार्गदर्शन करताना वरिष्ठांच्या आलेल्या सूचनेचे इतिवृत्त गणेश मंडळाला कळविण्यात येईल. त्या अनुषंगाने सण, उत्सव, तेव्हार यामध्ये डीजे सारखे वाद्य वाजविण्याची परवानगी देण्याबाबत सूचित करण्यात येईल. असे दर्शवून काळी (दौ.) गावामध्ये तसेच परिसरातही आदर्श निर्माण होण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असेही त्यांनी सुचित केले

शांतता समितीच्या सभेमध्ये शांतता कोणत्या कारणाने भंग होऊ शकते, शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कृत्याबाबत किंवा पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अंतर्गत सुरू असलेले अवैद्य व्यवसाय बंद ठेवण्याबाबत “ब्र” शब्दही उच्चारला गेला नाही. शांतता भंग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या अवैद्य व्यवसायाबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची सूचना किंवा दक्षता घेण्याबाबतचे चर्चिल्या गेले नाही.त्यामुळे शांतता सभेकरिता आलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे.
शांतता समितीचे सभेकरिता प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच सुभाष रामभाऊ कोसलगे, आझाद पटेल,पोलीस पाटील दवणे,तंटामुक्तीचे अध्यक्ष उज्वल रणवीर, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संतोष राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हंसराज मोरे, मो.शारीक अ. वहाब,श्रीनिवास मोरे,शरद काळे, देवानंद आंबोरे यांचे सह काळी (दौ.) परिसरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख, पोहवा. प्रेम आडे, पोहवा. हनुमान गंगासागर यांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply