
पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण तथा पोलीस स्टेशन खंडाळा यांचे कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अवैद्य व्यवसायांनी थैमान घातले आहे. अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या नागावल्या जात आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये वरळी मटका, जुगार, अवैद्य गावठी दारू आदी व्यवसायामुळे गोरगरीब जनतेची संसार उध्वस्त होत चालली आहे. कित्येक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे.
ही अवैद्य धंदे त्वरित कायमस्वरूपी बंद होण्याच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लेखी निवेदन देत अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन तथा खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेली अवैद्य व्यवसाय त्वरित बंद न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशाराही शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विकास जामकर, पुसद तालुका प्रमुख गणेश पागिरे,शिवसेना शहरप्रमुख दीपक शांतीनाथ उखळकर, पुसद विधानसभा समन्वयक संजय सिंह बयास, शहर प्रमुख संतोष दरणे, शहर संघटक अनिल चव्हाण पाटील, शहर समन्वयक अनिल तोंडारे, अल्पसंख्यांक शहर प्रमुख राजीक देशमुख, अध्यात्मिक आघाडीचे मनोज कोलेकर, उप तालुका प्रमुख शैलेश चंदेल, उप तालुका प्रमुख बाळासाहेब बेंद्रे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग माहुरे, विशाल पेन्शनवार विधानसभा संघटक, भाऊराव बेले आदिवासी आघाडी प्रमुख, सुरज मोहेकर शाखाप्रमुख, प्रशांत साखरे विभाग प्रमुख, श्याम ठाकूर विभाग प्रमुख, आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे.

पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पुसद शहरांमधील अवैद्य व्यवसाय कायमस्वरूपी बंद होणार का ? याची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढली आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply