शहराच्या सौंदर्यिकरणासाठी दुभाजकात लावलेली झाडे बेपत्ता

पुसद शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याच्या उद्देशाने फु. ना. ते बा.ना. महाविद्यालय पर्यंत च्या हम रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करण्यात आलेली आहे
या दुभाजकामध्ये आकर्षक, मनमोहक अशी फुल झाडे लावून पुसदच्या सौंदर्यकरणांमध्ये भर घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला होता. दुभाजकामध्ये लावलेली झाडे कोठे बेपत्ता झाली? याचा थांग पत्ता लागणे कठीण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तसेच संबंधित कंत्राटदाराच्यावतीने दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्याचे काम नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र दुभाजका मधली झाले नागरिकांच्या दृष्टीपथास पडणे कठीण झाले आहे. ही झाडे कोठे बरे निघून गेली असावी? या झाडांना पाय तर फुटले नसावे ना?अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.
दुभाजकांमध्ये लावलेल्या बेपत्ता झाडांची शोध मोहीम हाती घेऊन संबंधित बांधकाम विभाग शोध लावेल का? असाही प्रश्न जनमानसामध्ये चर्चिल्या जात आहे.दुभाजकांमध्ये लावलेली विविध जाती प्रजातीची सौंदर्यमय फुलझाडे बेपत्ता झाल्यामुळे या दुभाजकांमध्ये बेशरमाची झाडे लावण्याचा तर बांधकाम विभागाचा विचार नसावा ना?अशीही जनमानसात चर्चा आहे. बेपत्ता झाडे शोधण्याचे दिव्य कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग करेल का? दुभाजकामधील बेपत्ता झालेली झाडे शोधून पूर्ववत दुभाजकांमध्ये लावण्याचे कार्य संबंधित विभाग करेल का असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply