
शाळा सोडून राजकीय समीकरणात व्यस्त असणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय
शासकीय तथा निमशासकीय अनुदानित शाळांवर शासनाचा लाखो रुपयांचा निधी दिल्या जातो. शासकीय तथा नीमशासकीय अनुदानित शाळेवरील काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकविण्यापेक्षा चौकात बसून नागरिकांना राजकीय धडे शिकविण्याचे कार्य करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अन्धकारमय होत असल्याची पालकांत चर्चा आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असताना काही शिक्षक महोदय शाळेच्या वेळेत नामांकित हॉटेलमध्ये बसून नाईकांच्या राजकारणातील समीकरणे जुळवण्यात अधिक आवड घेत असल्याची जनमानसात तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगूलागली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनी जर राजकीय डावपेच, गटबाजी आणि नेत्यांच्या राजकीय समीकरणांमध्येच अधिक वेळ घालवला, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे आणि त्यांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
राजकारणात गोडी असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असू शकतो, मात्र शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हीच आहे. त्यामुळे शिक्षक महोदयांनी नामांकित हॉटेलमधील राजकीय बैठका आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या तासिका यापैकी नेमके प्राधान्य कशाला दिले पाहिजे, हे ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांनीच ठरविले पाहिजे असा प्रश्न चर्चेत आहे.
नाईकांच्या राजकारणाची समिकरणे नामांकित हॉटेलमध्ये बसून कधीही घेता येईल पण विद्यार्थ्यांची अभ्यासांची तासीके आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची संधी पुन्हा मिळेल का? असा प्रश्नही पालक उपस्थित करीत आहेत. संबंधित विभागाने या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून शिक्षकांची शाळेतील उपस्थिती, अध्यापनाचे तास आणि शैक्षणिक कामकाज याबाबत चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
राजकारणाची समीकरणे जुळवणाऱ्या शिक्षकांनी आधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे समीकरण जुळवावे, एवढीच पालकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

मुख्य संपादक :- रामराव रतन राठोड
संपर्क: 9623796543/9423433013
नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी झगर न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543










Leave a Reply