
गोर सेनेच्या वतीने गौळ खुर्द येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
पुसद तालुक्यातील गौळ खु ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी भारतीय सैनिक श्री. रंजीत चव्हाण व श्री. प्रमोद राठोड हे दोघे दिनांक 17 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाची दखल शासन व प्रशासनाने घेतलेली नाही.
उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे.
या उपोषणाला गोर सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. गावकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात यासाठी गौळ खु ग्रामस्थ व गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन पोफाळी व तहसील कार्यालय पुसद येथे निवेदन दिले आहे.
. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पासून पुसद ते उमरखेड रोडवर गौळ खुर्द या ठिकाणी गावकरी व गोर सेना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
यास होणाऱ्या कोणत्याही परिणामाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात गावातील सर्व गोर बांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. असेही गोर सेनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543







Leave a Reply