
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची भेट
काळी दौ.येथील वसंतराव नाईक विद्यालयात 15 ऑगस्ट 2026 रोजी विद्यालयाचे प्रांगणात ईयता दहावी व बारावी मध्ये प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोहिदास चव्हाण व राजू नरवाडे यांचे तर्फे संविधान प्रत तथा रामराव राठोड लिखित झगर पुस्तक सस्नेह भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील प्रकाश दवणे, तंटामुक्ती अध्यक्ष उज्वल रणवीर, शिवसेनेचे पदाधिकारी संतोष राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पठाडे, सुभाष राठोड यांचे सह पालक तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोहिदास चव्हाण तथा राजू नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची सस्नेह सप्रेम भेट दिली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधान प्रत तथा झगर पुस्तक देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543







Leave a Reply