Skip to content
  • Sunday, 29 November 2026
  • 7:46 am
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाख रुपयांची  लाच घेताना रंग हात पकडले
राजकारण

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाख रुपयांची  लाच घेताना रंग हात पकडले

Ramrav Rathod Aug 15, 2026 0

पुसद येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण याच्यावर लासलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती च्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख रुपये  स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
           प्राप्त माहितीनुसार दिनांक १४ ऑगस्ट २०२६  रोजी  तक्रारकर्ता कंत्राटदार यांनी  लेखी तक्रार दिली होती. आरोपी लोकसेवक जनार्दन चव्हाण यांनी तक्रारदार यास महावितरण उपविभाग पुसदचे अंतर्गत येणारे ब्रेकडाऊन व मेंटेनन्स चे एकूण २० लाख रुपये किमतीचे 9 वर्क ऑर्डर  दिल्याने तसेच भविष्यात सदर बिलाची रक्कम मंजूर करून त्याचे देयक मिळवून  देण्याकरिता 20% दराने ४ लाख रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती.       
        दिनांक १४ ऑगस्ट २०२६  रोजी  सकाळी ९.३० वाजेचे सुमारास  कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण यांचे क्वार्टर, विद्युत भवन पुसद येथे दिलेल्या वर्क ऑर्डरच्या एकूण किमतीच्या २० टक्के दराने ४ लाख रुपये लाच रक्कम मागणी करून ती सायंकाळी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
         दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेचे सुमारास विद्युत भवन पुसद येथील कार्यकारी अभियंता यांचे क्वार्टर मध्ये
जनार्दन चव्हाण यांना तक्रारदार यांचेकडून ४ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
      सदर कारवाई नंतर पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील प्रक्रीया चालू आहे. आरोपी लोकसेवकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली आहे.आरोपीची घरझडती घेण्याची कारवाई चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई संजय शिंदे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती,  राजेश राठोड पो.उप.अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, पोलिस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोनि. रविंद्र सहारे, पोनि संजय शिंदे, पोलिस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, वाहन चालक, राजेश बहिरट, उमेश बुजाडे यांनी पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती .
यांच्या मार्गदर्शनाखाली कारण्यात आली.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
राजकारण
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची भेट
Ramrav Rathod Aug 18, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
Vidhyalankars poddhar larning school shodh nibandh purshkar
Ramrav Rathod Oct 31, 2026
Blog
Pusadchya saurabh bhangade yanchi vaidhakiy kshetrat baji
Ramrav Rathod Oct 27, 2026
Blog
Tender murmache pratyakshat wapar maticha
Ramrav Rathod Oct 14, 2026
Blog
Malwagad:
Ramrav Rathod Oct 3, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile