Skip to content
  • Thursday, 1 October 2026
  • 5:22 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात आढळले दोन साप; सर्पमित्रांकडून एका ८ फूट सापाचा सुरक्षित रेस्क्यू
मनोरंजन

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात आढळले दोन साप; सर्पमित्रांकडून एका ८ फूट सापाचा सुरक्षित रेस्क्यू

Zagarnews Aug 18, 2026 0

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या आवारात सोमवारी रात्री दोन साप आढळल्याने काही काळ खळबळ उडाली होती. बंगल्याच्या परिसरात दोन साप एकमेकांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली.

८ फूट लांबीचा धामण साप आढळला

वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार मन्नत बंगल्याच्या परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान एका शिडीखाली सुमारे आठ फूट लांबीचा धामण साप आढळून आला. हा साप बिनविषारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्पमित्र विक्की दुबे यांनी कोणतीही इजा न करता त्याला सुरक्षितपणे पकडले.

दुसरा साप निसटला, शोधमोहीम सुरू

दरम्यान, मन्नत बंगल्याच्या परिसरात नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढल्यामुळे दुसरा साप तेथून निसटला. या दुसऱ्या सापाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, परंतु तो आढळून आला नाही.

पकडलेला धामण साप बिनविषारी असल्याचे समजल्यानंतर ‘मन्नत’मधील सुरक्षा कर्मचारी आणि घरातील व्यक्तींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पकडण्यात आलेल्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेला शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला हा नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. येथे नेहमीच चाहत्यांची गर्दी असते. त्यामुळे या परिसरात साप आढळल्याची बातमी समोर आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली होती.

Zagarnews
Zagarnews

मन्नतमुंबई newsवन विभागवांद्रेशाहरुख खानसाप
Zagarnews

Website: https://zagarnews.online

Related Story

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile